Breaking Ticker

वसंतराव नाईक महाविद्यालयात सायन्स फोरमतर्फे विविध स्पर्धेचे आयोजन



कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुल शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सायन्स फोरमतर्फे 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन मा. प्रा. डॉ. हरीश गणेश नेमाडे, मा. प्रा. डॉ. राकेश दयाराम तळेले धनाजीनाना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फैझपूर यांच्या हस्ते करण्यात आले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.डी.राठोड उपस्थित  होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स फोरमतर्फे सायन्स क्विझ, पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण घेण्यात आले.

याप्रसंगी मा. प्रा. डॉ. हरीश गणेश नेमाडे म्हणाले की विद्यार्थांनी उत्तम दर्जाचे पोस्टर व पीपीटी तयार केले, यावरून त्यांच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. विद्यार्थांनी सध्या येणाऱ्या विषयावर अभ्यासकरून त्या संदर्भातील वैज्ञानिक संकल्पना पोस्टर्स, शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडायला पाहिजेत तरच यातून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध व्हायला मदत होईल, असे प्रतिपादन केले.              

कार्यक्रमासाठी प्रथम वर्ष विज्ञान ते एम. एस्सी. पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पॉवरपॉईंट सादरीकरणात १६ विद्यार्थ्यांनी व २० पोस्टर प्रदर्शन करीता ३४ विद्यार्थ्यांनी व आंतरविद्याशाखीय सामान्य विज्ञान प्रश्नमंजुषा परीक्षेत १४८  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरविद्याशाखीय सामान्य विज्ञान प्रश्नमंजुषेत गिरासे योगेश कोमलसिंग प्रथम, मराठे पंकज प्रवीण व पाटील रोशनी संजय द्वितीय, मालचे रोहित बिजू तृतीय तसेच चित्ते धीरज विजय व मोरे अनमोल उत्तम उत्तेजनार्थ राहिला.

पॉवरपॉईंट सादरीकरणात तृतीय वर्ष भौतिकशास्त्राची कुलकर्णी आकांक्षा संदीप प्रथम, तृतीय वर्ष रसायनशास्त्रचा उमेश पाटील द्वितीय, तृतीय वर्ष रसायनशास्त्रची मुस्कानबानो झुल्फिकार अली तृतीय व द्वितीयवर्षाची अंजली धनराज वाघ ही उत्तेजनार्थ राहिली.

पोस्टर प्रदर्शनात तृतीय वर्ष रसायनशास्त्रचा पाडवी रुमालिया रंगल्या प्रथम, एम. एस्सी रसायनशास्त्रची उत्कर्षा ठाकरे द्वितीय, द्वितीयवर्ष वनस्पतीशास्त्रचा प्रभु संजय जाधव व सोहल पठाण तृतीय तसेच द्वितीय वर्ष भौतिकशास्त्रची सय्यद मिनाझ मोअज्जम व सय्यद उज्मा मोअज्जम तसेच प्रतीक्षा जे. पानपाटील व राजश्री पी. गिरासे हे उत्तेजनार्थ राहिले.

पॉवरपॉईंट व पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून पीएसजीव्हीपी संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. अ. जी. बेलदार व प्रा. डॉ. वाय. एच. वासू यांनी काम पहिले. प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. पदार्थविज्ञान विषयाचे प्रमुख व सायन्स फोरमचे समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचा परिचय करून दिला. पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरणचे समन्वयक प्रा. डॉ. अ. व्ही. पाटील तर पॉवरपॉईंट सादरीकरणाचे समन्वयक प्रा. डॉ. जी. ए. पडघन यांनी केले. तांत्रिक बाब प्रा. डॉ. एस. एस. ईशी, प्रा. डॉ. एस. डी. खैरनार, प्रा. डॉ. आर. बी.मराठे,  प्रा. डॉ. के. एल. पाटील सरांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव ताईसाहेब वर्षाताई जाधव, कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु संजयजी जाधव व संस्थेचे समन्वयक श्री. संजय राजपुत यांनी कौतुक केले.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.