शहादा शहरातील बाजारपेठसह प्रत्येक रहिवासी कॉलनीतील गटारीची साफ-सफाई करून तात्काळ जंतुनाशक औषधी फवारणी, धुरळणी करण्यासह रस्त्यावरील बांधकाम साहित्य, रस्त्यालगत व खुल्या जागेतील झाडे-झुडपे तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केली आहे.
शहादा प्रतिनिधी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शिवसेना शहादा तालुका मार्फत दिलेल्या दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, शहादा शहरातील बाजारपेठ सह प्रत्येक रहिवासी कॉलनीत अस्वच्छता निर्माण झाली असल्याने मच्छरासह डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रोगराई प्रचंड प्रमाणात वाढलेली असल्याकारणाने शहरातील सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचसोबत संपूर्ण शहरातील एकूण सर्वच गटारी ह्या कचरा व दूषित पाण्याने भरलेल्या असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.
शहादा शहरातील बाजारपेठसह रहिवासी कॉलनीतील बहुतांश रस्त्यावर मधोमध मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य पडलेले आहेत. अनेक रस्त्यांच्या लगत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. परंतु भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच शहरातील प्रत्येक खाजगी व सार्वजनिक खुल्या जागेत सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे प्रचंड वाढलेले आहेत.
तरी आपल्या स्तरावरून शहादा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताकरिता तातडीने तात्काळ खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात यावी.......
*शहरातील एकूण सर्वच गटारी ह्या तुडुंब भरलेले असून एकूण सर्वच गटारी हवा विनाविलंब साफ-सफाई करण्यात यावी.
*बाजारपेठ सह प्रत्येक रहिवासी कॉलनीत त्वरित जंतुनाशक औषधी फवारणी करून मच्छरासह डासांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तात्काळ धुरळणी करण्यात यावी.
*बाजारपेठ सह प्रत्येक रहिवासी कॉलनीतील रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेले बांधकाम साहित्य तात्काळ हटविण्यात यावे व रस्त्याच्या लगत असलेल्या दोन्ही भागातील झाडे-झुडपे त्वरित तात्काळ काढण्यात यावे.
*संपूर्ण शहादा शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे व सार्वजनिक शौचालय संख्या अत्यल्प असून संपूर्ण शहादा शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे व सार्वजनिक शौचालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात यावे.
*सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर कचरा व घाण टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
*शहरात बेवारस कुत्रे (श्वान), डुक्कर (वराह) व इतर जनावरे मृत झाल्यास तात्काळ मृतदेहाची विल्हेवाट लावली जात नाही.त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत असते. जनावरांच्या मृतदेहाची तात्काळ विल्हेवाट व्हावी याकरिता शहादा नगरपालिकामार्फत आरोग्य दूतांची नेमणूक करून शहरात आरोग्य दूतांचे मोबाईल नंबर सार्वजनिक करण्यात यावे.
*संपूर्ण शहरात सर्वच रहिवासी भागातील अनेक सार्वजनिक व खाजगी खुल्या जागेत झाडे-झुडपे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, ती तात्काळ काढण्यात यावी.
वरील नमूद सर्व गंभीर बाबींबाबत शहादा शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून याकरिता नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सर्व गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन त्वरित योग्य उपाययोजना करण्यात यावी अन्यथा शहादा शहरातील नागरिकांच्या हिताकरिता शिवसेनेतर्फे प्रखर आंदोलन छेडले जाईल याची दक्षता घेण्यात यावी. आंदोलना दरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शहादा नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील, याचीही दखल घेण्यात यावी. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेने तर्फे दिलेले निवेदन शहादा नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रज्ञाशील निकम यांनी स्वीकारले.यावेळी निवेदन देतांना शिवसेनाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या सह डॉ.राजेंद्र पेंढारकर,सुपडू खेडकर,सागर चौधरी,तुकाराम भोई,बापू गुलाले,इरफान शेख,जयसिंग ठाकरे,कृष्णा नगराळे,हितेंद्र वर्मा,गोपाल कोळी,ज्ञानेश्वर तांबोळी,अँड.लव लोहार, ,अँड भोजेंद्र शिंदे,मुस्तफा खाटिक, पप्पू सय्यद,मनोज पाथरवट,सुकलाल कोळी,जयेश निकम,जगदीश पाटील ,मयूर जैन,रवी नाईक,अंकुश लोहार,दिलीप पवार यांची उपस्थितीसह निवेदनावर सह्या आहेत.
