Breaking Ticker

लोकमान्य टिळक चौकात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

 


शहादा दि.२३

 जगाच्या पाठीवर एकमेव भारत हा देश सनातनी आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताला हिंदुत्व प्राप्त झाले नसते सनातनी, हिंदुत्व या देशाला निर्माण व्हायचं असेल तर संपूर्ण देशातील हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे सनातन जागृतीसाठी जात-पातीचे दुर्गुण दूर करून एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दत्ताधाम परिसर तापी कुटिया येथील ह भ प सुनील महाराज यांनी शहादा येथे हिंदू संमेलनामध्ये मत व्यक्त केलेला आहे.

     शहरातील सोनारवाडी लगत लोकमान्य टिळक चौकात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ह भ प सुनील महाराज यांनी सनातन बाबत आपले मत व्यक्त केले आहेत यावेळी ह भ प हर्षल कुलकर्णी ,प्रांत सेवा प्रमुख गिरीश बडगुजर ,शहादा तालुका राष्ट्रीय संघाचे संघचालक डॉ. हेमंत सोनी आदि मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता, याहा मोगरा माता , शि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेच पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहरातील हंस क्लाथ दुकानापासून संत महंतांच्या रथयात्रेवरती भव्य मिरवणूक काढण्यात आलेली होती. मेन रोड, सोनार गल्ली ,मारवाडी गल्ली ,तूप बाजार, हुतात्मा लालदास चौक, गुजर गल्ली व लोकमान्य टिळक चौक या ठिकाणी येऊन ही मिरवणूक थांबली होती दरम्यान रस्त्यावर आजूबाजूला असलेल्या घरातील महिलांनी संत महंतांच्या अंगावर फुलांच्या वर्षाव केलेला होता. या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

   ‌ ह भ प सुनील महाराज यांनी सांगितलं की भगवा दारी संतांनी सनातनाकरिता वाहून टाकलेले आहे भारत हा सनातनी देश आहे असे म्हटले जाते शिवाजी महाराजांनी बाला बलुतेदार समाजाला एकत्र करून भारत वर राज्य करणारा विरुद्ध शस्त्र उभारले होते याच भारताला हिंदुत्ववादी राष्ट्र म्हणून व सनातन करून घेण्यासाठी

 सर्व जाती धर्माच्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन हा सनात आणि देश निर्माण होण्याची काळाची गरज आहे. हिंदू धर्मातील तरुण हा बहुतांश या मंदिरात पोहोचत नाही या चुलत मुस्लिम समाजातील प्रत्येक तरुण हा मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी जात असतो हिंदू धर्माची संस्कृती दोन हात एक नतमस्तक आहे बहती गंगा बहता साधू साधू लोकांचे कल्याण करत असतो हिंदू धर्माचे धूळ तुमच्या नतमस्तकाला लावावी यासाठी सनातनी भगवा हे प्रयत्न करत असतात. रामनवमी शिवजयंती महावीर जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या विविध सण उत्सव हे हिंदू म्हणून जगण्याच्या एक ध्येय आहे आजच्या या विराट संमेलनात महिलांची मोठी उपस्थिती आहे महिलांकडे जगदंबेचे स्वरूप आहे. धर्म संकटात आहे क्षणात असं सनातनासाठी व देवासाठी वेळ द्या, हिंदू मिळावा गेल्या मागचे उद्देश हिंदू असलेल्या जाती-जमातीच्या प्रत्येक व्यक्तीच्या युवकांचे युवतींच्या तरुण-तरुणी वयोवृद्ध महिला पुरुष यांच्या रक्त फिल्टर करण्याचे व जनजागृती करण्याचे एक स्थान असल्याचे हभप सुनील महाराज यांनी व्यक्त केलेला आहे. 

     ह भ प हर्षल महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले की कुठलीही कार्यकर्त्यांना संकल्पना असणे गरजेचे आहे त्याशिवाय ध्येय पूर्ण होत नाही भारतीय संस्कृती सनातन टिकवण्यासाठी अशा हिंदू मुलांची घेणे काळाची गरज आहे आज भारतामध्ये नारी शक्ती जे करू शकते ते कोणीही करू शकत नाही. भारतात हिंदू समाजात जातीपातीत विखुरले  गेल्या असल्याने एकत्र येण्यास मोठा अवधी लागत असतो भारत सनातनी हिंदुत्ववादी राष्ट्र होण्यासाठी सर्व जाती-धर्माच्य लोकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे घराघरात गल्लीत संघटन नाही संघटनासाठी एकत्र येणे ही काळाची गरज येऊन बसलेली आहे आज आपला हिंदू तरुण हा मोबाईल मध्ये गुंतून गेलेला आहे. देव देवतेच्या दर्शनापेक्षा मोबाईल हा त्याच्या जवळच झालेला आहे देश धर्म संस्कृती जतन कसे करावे याच्या विसरता तरुणांमध्ये होत चाललेला आहे भारतीय संस्कृती संघटन नसल्याने अधर्मीयांच्या वार सुरू आहे हिंदू धर्म की जय बोलून चालणार नाही संघटित असलो तर जय होणारच आहे. 

 भारत देशामध्ये 95 टक्के पेक्षा जास्त हिंदू लोक राहून देखील हिंदू राष्ट्र नाही असे सांगून ह भ प हर्षल महाराज म्हणाले की विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करा व स्वदेशी वस्तूंच्या वापर करा आज विदेशी वस्तूंच्या वापर करण्यामागे वर्षाकाठी भारतातून पाच लाख करोड रुपये विदेशात जात आहे म्हणून प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की स्वदेशी वस्तूच्याच वापर करावा हे केल्याने आपला पैसा व आपली संपत्ती याच भारतात स्थायिक राहील असे देखील ह भ प कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल साळुंखे यांनी केला कार्यक्रम यशस्वी करिता हिंदू विरार समितीचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतलेले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.