Breaking Ticker

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी चव्हाण भारती संजू हीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल (महिला) संघात निवड.


..

शहादा -  पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाची विद्यार्थिनी कु. चव्हाण भारती संजू हीची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) संघात निवड करण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय सॉफ्टबॉल मुलींच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली होती. ह्या वर्षी सॉफ्टबॉल (महिला) आंतरविद्यापीठ स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती (महाराष्ट्र) येथे येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेसाठी कु. चव्हाण भारती संजू हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघात निवड करण्यात आली होती आणि ती विद्यापीठाच्या संघाकडून खेळून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.

 कु. चव्हाण भारती संजू ही सध्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून तिने सॉफ्टबॉल खेळात उत्तम कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली होती आणि तिने महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. तिच्या या निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूर भाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले. कु. चव्हाण भारती संजू हीस महाविद्यालयाचे क्रीड़ा विभाग प्रमुख प्रा.हितेंद्र चौधरी यांनी प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले. तिच्या ह्या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.