Breaking Ticker

भारतीय जैन संघटनेतर्फे शिंदखेडा व नरडाणा येथे ‘करिअर कंपास’ कार्यक्रमाचे आयोजन



शहादा, प्रतिनिधी — भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) वतीने दिनांक २५ एप्रिल २०२६, शनिवार रोजी शिंदखेडा व नरडाणा येथे विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर कंपास’ या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअर क्षेत्रांची ओळख करून देणे, उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व, आवडीनिवडी आणि कौशल्यांच्या आधारे योग्य करिअर निवडण्यास मदत करणे हा आहे, अशी माहिती खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा व उपाध्यक्ष भवरलाल जैन यांनी दिली.

शनिवार, दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता जनता हायस्कूल, शिंदखेडा येथे पहिला कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मनोहर पाटील राहतील. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य श्याम पाटील उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर सकाळी १० वाजता विकास विद्यालय, नरडाणा येथे दुसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित सिसोदे राहतील, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पी. व्ही. सिसोदे उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही ठिकाणी शहादा येथील करिअर काउंसलर व क्वालिटी नॉलेज सर्कलचे संचालक प्रा. मनोजकुमार बाफना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात सर्व शाळांतील १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा, अशोक राखेचा, शिंदखेडा बीजेएस अध्यक्ष मयूर ओस्तवाल, लाखिचंद बोथरा, विभाग सचिव प्रकाश खिच्चा, नरडाणा अध्यक्ष डॉ. प्रितेश जैन व राहुल चोरडिया यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.