Breaking Ticker

परतुर तालुक्यातील भूमिपुत्राची मोठी कामगिरी डॉ गणेश आकात यांची सहयोगी प्राध्यापक पदी नियुक्ती



परतुर :जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील सातोना खुर्द येथील भूमिपुत्र डॉ गणेश बाबासाहेब आकात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक (रसायनशास्त्र)या मानाच्या पदावर नियुक्त झाली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (महाविद्यालयीन शाखा )मध्ये ही निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे .महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा द्वारे राज्यातील विविध उच्च पदासाठी निवड केली जाते. आणि शिक्षण प्रक्रिया अत्यंत स्पर्धात्मक व गुणवत्ताधारित असते अशा कठीण परी प्रक्रियेतून यश संपादन करत डॉगणेश आकात यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे 

  या यशामागे त्यांची अपार कस्टमर मेहनत आणि जिद्द आणि चिकाटी असून त्यांची आई व वडिलांची भक्कम साथ ही त्यामागील मोठी ताकद ठरली आहे .अत्यंत खडतरआणि संघर्षमय जीवनातून त्यांनी यश मिळवले असून त्यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी अनेकांसाठी मार्गदर्शक ठरली आहे

  आकात यांचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात बायोडाटा अत्यंत समृद्ध आणि उल्लेखनीय आहे .त्यांनी 14 भारतीय पेंटर्स प्रकाशित केले असून 5 भारतीय डिझाईन पेंटर्स मंजूर झाले आहेत तसेच 1 अमेरिका असे एकूण 20 पेटंटही त्यांच्या नावावर आहेत .याशिवाय त्यांनी 5 पुस्तके व 11 पुस्तक प्रकरणे (बुक चॅप्टर्स )प्रकाशित केली आहे .राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर 71 संशोधन निबंधाचे सादरीकरण पण त्यांनी केलेअसून विविध नामांकित जर्नल्स मध्ये त्यांचे संशोधन पर लेखांचे प्रकाशन झाले आहे त्यांच्या यशामुळे सातोना खुर्द तसेच परतुर तालुका आणि संपूर्ण जालना जिल्ह्याचा मान उंचावला असून त्यांच्या कुटुंबासह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे सर्व स्वाभिनंदन होत आहे त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून उच्च शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण झाला आहे त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव  होत आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.