Breaking Ticker

श्री सिद्धि गणेश मंदिराच्या स्थापना दिवस नुकताच साजरा

 


प्रतिनिधी शहादा 

    शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धि गणेश मंदिराच्या स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला यावेळी शेकडो भाविक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते धार्मिक पूजा विधी व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली होती. 

       24 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 2002 रोजी गणपती मंदिरात सिद्धिविनायक गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती शहाद्या शहरासह परिसरातून पितळी वस्तू गोळा करण्यात आल्या होत्या त्यांच्या सोबतच पंचधातू असलेले वस्तू देखील गोळा करण्यात आल्या शहरात पहिल्यांदाच पंचधातूपासून गणपतीची मूर्ती बनवण्यात आली बघता बघता भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून श्री सिद्धी विनायक गणपती मंदिर परिसरात प्रसिद्ध झाले 

      सिद्धी गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे स्थापना दिवसानिमित्ताने धार्मिक पूजाअर्चा करून महाआरती करण्यात आली. महाआरतीनंतर लागलीच भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळी दहा वाजेपासून भंडारा प्रसादाला सुरुवात झाली तर दुपारी दोन वाजेपर्यंत भंडारा प्रसाद वाटप सुरू होते. भंडारा प्रसादाच्या लाभ पंधराशे भाविकांनी घेतल्याच्या अंदाज आयोजकांमार्फत करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.