Breaking Ticker

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश...



शहादा – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एनबीईएमएस) मार्फ़त घेण्यात आलेल्या जी - पॅट २०२६ (ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. दरवर्षी जी - पॅट परीक्षा संपूर्ण देशातून बी. फार्मसी पदवीधारक किंवा पदवीच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच एम. फार्मसी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ४ विद्यार्थी जी - पॅट २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यात जी - पॅट परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी पाटील रुचिका राजेंद्र (२३३ गुण), पाटील योगिता मोतिलाल (२१९ गुण), निकुंभे जयदीप विष्णू (१९५ गुण), पाटील डिंपल किशोर (१७८ गुण) मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. 

जी - पॅट २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा १२ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते त्यासाठी महाविद्यालयातील चार विद्यार्थी पात्र झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याना देशातील नामांकित संस्थेमध्ये प्रवेशाची संधी मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन व भविष्याच्या दृष्टीने जी - पॅट परीक्षा ही खूप महत्वाची ठरते. विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सातत्याने महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यास वर्गांचे आयोजन व मार्गदर्शन, तज्ञ प्राध्यापकांचे मार्गर्शनवर आधारित गेस्ट लेक्चर, विशेष मार्गदर्शन सत्र वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. जी - पॅट २०२६ परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांना दिले. 

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, अनिल भंसाली, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.सैय्यद हमीद हसनी, डॉ.सुनिला पाटील, प्रा.डॉ.राहुल लोव्हारे, प्रा.सुलभा महाजन, प्रा.योगेश रोकडे, प्रा.अमित धनकानी, प्रा.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.मानसी धनकानी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.आझम शेख, प्रा.समीर शेख, प्रा.रोशन चौधरी, प्रा.मृणाल पेंढारकर, प्रा.नेहा पाटील, प्रा.कृतज्ञा पाटील व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले व परिश्रम घेतले. जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेसाठी जी - पॅट परीक्षा प्रमुख प्रा.योगेश रोकडे यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.