Breaking Ticker

ठाणा (ता. आमगाव) येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने थंड पाण्याच्या प्याऊचे लोकार्पण



प्रतिनिधी: तामेश्वर पंधरे गोंदिया 

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ग्राम ठाणा येथे आज दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर थंड पाण्याच्या प्याऊचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा मिळावा या उद्देशाने ठाणा बस स्टॉप येथे ही सुविधा सुरू करण्यात आली.या उपक्रमाचे आयोजन श्री प्रदीपजी बावनथडे, पोलीस पाटील ठाणा तसेच स्वर्गीय राजूजी शेंडे क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक श्री गजेंद्र शेंडे यांच्या वतीने करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सोबिलालजी कटरे, सी.जी. पौलझगडे सर, महारवाडे सर, गोपालजी हनवाटे, कारोजी आग्रे, हेतरामजी येडे, राजेश सोनवणे, सुरेशजी मेश्राम, नितेश रहांगडाले, विकासजी देसकर, मेश्राम सर, सुखरामजी नागरीकर, योगेश मेश्राम, दीपकजी कटरे, भारतजी गोंडाने, जितेंद्रजी चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. भीषण उकाड्यात प्रवाशांसाठी थंड पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.