Breaking Ticker

कळंब येथे कलावंत मार्गदर्शन मेळावा तथा चरण पादुकासह पदयात्रेचे उद्घाटन .




स्वप्नील घोटेकार जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 

श्री गुरुदेव च्या कृपेने व कळंब तालुक्यातील सर्व नागरिकांचे आशीर्वादाने व भजन  मंडळी च्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने दिनांक 1 एप्रिल 2026 बुधवार ते दिनांक 10 एप्रिल 2026 शुक्रवार पर्यंत भवानी मंगल कार्यालय कळंब येथून ग्राम जयंती परवा निमित्त चरण पादुकासह पदयात्रा "चला एक पाऊल खेड्याकडे". या कार्यक्रमाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास सन्मान संस्था महाराष्ट्र राज्य शाखा कळंब तालुका व तालुका महिला गुरुदेव सेवा मंडळ कळंब जिल्हा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्त शाहीर रमेश वाघमारे व हंसराज तलवारे ढोलकीवादक व संच यांचा प्रबोधनपर कार्यक्रम . दिनांक एक एप्रिल बुधवार रोजी दुपारी 11 ते 2 वाजता भवानी मंगल कार्यालय येथे प्रवीण भाऊ देशमुख यांचे अध्यक्षतेखाली सूर्यप्रकाश जयस्वाल यांचे शुभहस्ते उद्घाटन पर डॉ ज्ञानेश्वरा मुडे ॲड श्याम खंडारे ,सिद्धार्थ भवरे विलासराव भोयर, विजयराव इंगोले खुशालराव ठाकरे अतिथी.

 दत्ताभाऊ मार्कंड गणेश धर्माळे राजेश मडावी मुरलीधर धनरे विजयाताई दहीकर मीनाताई वाघ पद्माकर ठाकरे आनंदराव जगताप शशिकांत देशमुख चंदू भाऊ चांदोरे पाहुणे .यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनपर कलावंत मार्गदर्शन मेळावा संपन्न होईल .दुपारी तीन वाजता चरण पादुकासह पदयात्रेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते होऊन प्रस्थान होईल. आणि प्रथम दुपारी चार वाजता नरसापुर पाच वाजता शंकरपूर सहा वाजता आष्टी येथे सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण कल्पनाताई शिवणकर यवतमाळ यांचे कीर्तन मुक्काम. दिनांक 2 एप्रिल सकाळीच नऊ वाजता मेंढला दुपारी बारा वाजता कोठा दुपारी तीन वाजता बऱ्हाणपूर सहा वाजता हिवरादरणे येथे सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण तुकाराम जी राऊत यवतमाळ यांचे कीर्तन व मुक्काम. दिनांक 3 एप्रिल सकाळी आठ वाजता हुस्नापूर नऊ वाजता सुकळी दुपारी बारा वाजता पार्डी दुपारी तीन वाजता पिंपळगाव सायंकाळी सहा वाजता दोनोडा येथे सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण रमेश विलायतकर यांचे कीर्तन व मुक्काम . ४ एप्रिल नऊ वाजता कामटवाडा दुपारी दहा वाजता मावळणी दुपारी12 वाजता सोनेगाव, सायंकाळी सहा वाजता पिंपळगाव सामुदायिक प्रार्थना सभा व पंढरीनाथ ठाकरे वेणी चांगुना यांचे कीर्तन व मुक्काम .दिनांक पाच एप्रिल सकाळीच नऊ वाजता सावरगाव सकाळी अकरा वाजता परसोडी बारा वाजता दहेगाव एक वाजता उमरी तीन वाजता धोतरा सायंकाळी सहा वाजता एकलारा, सामुदायिक प्रार्थना सभा शाहीर रमेश वाघमारे व ढोलकी वादक हंसराज तलवारे व संच यांचा सांस्कृतिक प्रबोधन कार्यक्रम .दिनांक सहा एप्रिल सकाळीच 8, वाजता तिरझडा 9 वाजता बोरीमहल 12 वाजता कन्होली ,दुपारी तीन वाजता मासोला दुपारी चार वाजता आंधबोरी 6 वाजता  राजुर सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण गजानन महाराज सुरकर यांचे कीर्तन.मुक्काम

 दिनांक सात एप्रिल सकाळ नऊ वाजता पोटगव्हाण दुपारी बारा वाजता नानझा तीन वाजता खोरद चार वाजता कुंसळ सहा वाजता डोंगरखड्डा सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण गोपाल बोरसरे वडकी यांची कीर्तन .दिनांक आठ एप्रिल सकाळी आठ वाजता अंतरगाव नऊ वाजता पालोती 12 वाजता मेटीखेडा   दुपारी तीन वाजता वटबोरी चार वाजता जोडमोहा सहा वाजता खटेश्वर सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण पांडुरंग महाराज लढी डोंगरखर्डा यांचे कीर्तन मुक्काम.दिनांक 9 एप्रिल सकाळीच नऊ वाजता शिवनी दुपारी बारा वाजता निरंजन माहूर तीन वाजता रासा सहा वाजता कारक सामुदायिक प्रार्थना सभा हरिभक्त परायण सुधीर चौधरी यांचे कीर्तन. दिनांक दहा एप्रिल सकाळी आठ वाजता सरपधरी  नऊ वाजता आमला येथे आगमन व गावात परिक्रमा   दहा ते बारा वाजता हरिभक्त परायण खुशाल दादा गोडबोले मानवता मंदिर यवतमाळ यांचे कीर्तन दुपारी बारा ते तीन वाजता समारोप कार्यक्रम मा प्राध्यापक वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री यांचे अध्यक्षतेखाली,ॲड प्रफुलभाऊ चव्हाण, हरिहर लिंगनवार ,अभिषेक पांडे वंदनाताई कुटे वंदनाताई मुर्खे उज्वलाताई बहाळे रमेश वाघमारे बंडूभाऊ उताणे रणधीर किंनाके मोरेश्वर गावंडे गजाननराव वाघ सविता ताई कन्नाके सुरेखाताई मोहनापुरे व समस्त आमला ग्रामवासीय यांची उपस्थितीत व मार्गदर्शनपर संपन्न होईल. कृपया कलावंत मार्गदर्शन मेळावा ग्राम जयंती जनजागृती परवा निमित्त चरण पादुकासह पदयात्रा चला एक पाऊल खेड्याकडे या उपक्रमात तन-मन-धनाने सहकार्य करावे असे आयोजकाकडून कळविण्यात येत आहे.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.