Breaking Ticker

महाराणा टायपिंगच्या उज्वल यशाची परंपरा कायम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशांत भाऊंनी केला हृदय सत्कार

 



श्रीक्षेत्र माहूर प्रविण बरडे 

माहूर शहरातील टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षापासून आग्रगन्य असलेली संस्था महाराणा टाईप रायटिंगच्या विद्यार्थ्यांनी सलग उज्वल यश संपादन केल्याने मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांनी याची दखल घेऊन इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक संचालकांचा हृदय सत्कार केला यावेळी मान्यवर उपस्थित होते

महाराणा टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने अनेक वर्षापूर्वी सर्वप्रथम माहूरमध्ये इन्स्टिट्यूटची स्थापना करून अनेक विद्यार्थी घडवून त्यांना शासकीय नोकरीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी घडवले आहेत तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमात संस्थेने मोलाची कामगिरी बजावली आहे संस्थेचे संचालक नयनसिंह राठोड श्रीमती मेघा मनवर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी सतत कार्यरत असतात 

मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड हे शिक्षण घेऊन भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सतत कार्यरत असतात त्यामुळे त्यांनी महाराणा टायपिंग इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याची माहिती मिळतात त्यांनी इन्स्टिट्यूट मध्ये येऊन सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार केला यावेळी पत्रकार विजय आमले दत्तात्रय शेरेकर एस एस पाटील लिंबायतचे उपसरपंच सुनील चुगडे श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय कांबळे बंडू राठोड प्रदीप पवार दीनेश पवार रवि वायकूळे करण गेडाम शेख सलिम कादर भाई बावाणी गजानन शद्दलवार दिगंबर जोशी राजू पवार नवल वानखेडे भारत राठोड यांचे सह मान्यवर उपस्थित होते यावेळी उल्लेखनीय यश संपादन केलेले विद्यार्थी नेहा राठोड - 88.5 चैतन राठोड - 88.5 नैना मुंडे - 87

आदीय कचवारे - 86 चैतन दुधे - 85.5

रोहन भहीरे बेहेरे - 82-5 नैतीक कांबळे - 80श्लोक श्दत्यवार - 79 प्रथम दुधे - 47

राधिका प्ररिहार - 76.5आदित्य पाँडे 75-5

संशम कोकाटे - 75 ओम राठोड 65

संकेद दूधे -65 कपील राठोड - 74 वरील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याने त्यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.