Breaking Ticker

विविध योजनेतील कामांचे थकलेली व नवीन निधी हप्ते लाभार्थीना तातडीने वितरीत करण्याची मागणी


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी 3/5/26

बाजार सावंगी  खुलताबाद तालुक्यातील विविध योजनेतील विविध कामांचे थकलेली व नवीन निधीचे हप्ते लाभार्थींना तातडीने वितरीत करण्याची मागणी लाभार्थी कडून गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनेतील घरकुल, वैयक्तिक विहीर, गाय गोठा, कुशल बील, रमाई घरकुल, रमाई घरकुल, शबरी, दिव्यांग घरकूल आदि व विविध योजनेतील लाभार्थी चे थकलेली व नवीन निधीचे हप्ते तातडीने वाटप करण्याची मागणी लाभार्थी करत असुण निधी हप्ता अभावी अनेकांचे काम ठप्प झाली आहे,

अनेकांनी उसनीवरी उधारीवर कामे करुन तकादा लावून घेतला व देणीघेणी मुळे लाभार्थी त्रस्त झाले असुण तातडीने थकलेली व नवीन निधीचे हप्ते वाटप करण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड, सत्तार पटेल, कलीम पठाण यांनी दि.३० रोजी गटविकास अधिकारी यांना देवून अवगत केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.