लऊळ : छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त लऊळ गावात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला गावातील शिवप्रेमी, संभूप्रेमी, सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, दूध उत्पादक तसेच अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्री काढण्यात आलेली भव्य मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. आणि “जय शिवराय”, “जय संभूराजे” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व शिवप्रेमी युवकांच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला