Breaking Ticker

विद्युत तारांचे घर्षणामुळे लागलेल्या आगीत पाईप, ठिबक सिंचन जळून खाक


मुनीर अब्बास शाह. बाजार सावंगी 

बाजार सावंगी : खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ येथील गट क्रमांक १८४ मध्ये विद्युत वाहक तारीतून खांबांवर घर्षणाने थिणगी पडून लागलेल्या आगीत पाईप, ठिबक, पॉलीथिन जळून खाक झाले. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी भागिनाथ काशिनाथ कामठे रा. कनकशीळ यांच्या शेतात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक विद्युत तारांतून थिणग्या पडून आग लागली. त्यात एक एकर मधील ठिबक, पाईप, शेत तळ्याचे पॉलीथिन जळून जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितल्या जात आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी आजुबाजुच्या अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, कडक ऊन व वाळलेले गवत यामुळे वेगात आग लागून हे नुकसान झाले. महसुल विभागाने याची दखल घेवून पंचनाम करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.