रिसोड प्रतिनिधी :धनंजय माळेकर
रिसोड-डोनगाव मार्गावर बिपखेड जवळ MH 26 S 1841 क्रमांकाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार,सकाळी 10 च्या सुमारास वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यालगत पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दरम्यान, अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख व अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
