*जवाहर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेशोत्सवात ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याने वेधले पालकांचे लक्ष*
आज जवाहर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी व पालखी सोहळा विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा केला. यात पारंपरिक ढोल ताशा, घोडेस्वार विद्यार्थी, विठ्ठल रुख्मिनी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, वारकरी वेशातील विद्यार्थी, स्काऊट गाईड मधील विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या पालखी सोहळ्याचे विविध नागरिकांनी व माताभगिनींनी औक्षण करून स्वागत केले. ग्रंथदिंडी शाळेत आल्यानंतर परिपाठ संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी श्री.भास्करराव देवकर, संचालक श्री.किशनराव वटाणे सर, जेष्ठ शिक्षक श्री.देवानंद वेंडोले सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर परिपाठाच्या सुरुवातीला सामूहिक महाराष्ट्र राज्यगीत गाण्यात आले. यानंतर संगीत विभागातर्फे सर्व मान्यवर आणि उपस्थित पालक, विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे श्री.प्रदीप महाजन सरांनी प्रस्ताविकातून विद्यालयाच्या निकालाचा इतिहास सांगत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मोफत पाठ्यपुस्तक आणि हरित सेना विभागातर्फे एक वृक्ष वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी कंटाळा न करता आपले काम प्रामाणिकपणे करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार श्री.प्रदीप चव्हाण सर यांनी मांडले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
