Breaking Ticker

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक संभाजीनगर विभागाच्या अल्पसंख्यांक जिल्हा सचिव पदी मोमिन बडेमिया शहा यांची नियुक्ती



मुनीर अब्बास शाह.   छ.संभाजीनगर प्रतीनीधी.           

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग अफजल फारूक यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी भवन, छत्रपती संभाजीनगर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रज्जाक पठाण आणि जिल्हा कार्याध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन यांनी केले.

बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रिझवान खान, समद बागवान, मुश्ताक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक, प्रदेश महासचिव वाजेद असलम, सलीम पटेल वाहेगावकर, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन , अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहम्मद ताहेर,तसेच जिल्हा संघटक जावेद मदार   यांची प्रमुख उपस्थिती मध्ये मोमीन शहा पिंपरखेडा ,कन्नड .यांची अल्पसंख्यांक जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.