Breaking Ticker

घनश्याम मापारी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुखपदी निवड



रिसोड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने घनश्याम मापारी यांची रिसोड तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

घनश्याम मापारी यांनी यापूर्वी पक्षाचे तालुका समन्वयक म्हणून काम करताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, विविध जनआंदोलने, शेतकरी प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे.

यावेळी घनश्याम मापारी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच वरिष्ठ नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, प्रत्येक गावात शिवसैनिकांना एकत्रित करून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रिसोड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.