Breaking Ticker

अटक टाळून मदतीसाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक



प्रतिनिधी- कुणाल दाणेच.

 गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तसेच अटक टाळून मदत करण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध कारवाई करत त्यांना अटक केली आहे

या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर (सध्या श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे, जि. अहिल्यानगर) यांच्यासह सुनील शिवाजी बोराडे आणि जगदीश तुकाराम बोराडे (दोघेही रा. पाटोदा, ता. येवला) यांना अटक करण्यात आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील एका गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी व अटक होऊ नये यासाठी मदत करण्याच्या बदल्यात बहीर यांनी खासगी मध्यस्थामार्फत चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.