Breaking Ticker

हातकणंगले शिंदेसेनेच्या तालुका प्रमुखपदी कृष्णाजी मसुरकर यांची निवड

 


जिल्हा प्रतिनिधी. वैभव हराळे 

पट्टणकोडोली : येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले कृष्णाजी मसुरकर यांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या हातकणंगले तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली. इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते मसुरकर यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.हातकणंगले तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे कृष्णाजी मसुरकर यांनी यावेळी सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविणे, शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.तालुक्यातील गावागावांत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन एकजुटीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे मसुरकर यांनी स्पष्ट केले.तसेच नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, रोजगार आणि शासकीय योजनांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पद हे केवळ जबाबदारी नसून जनतेची सेवा करण्याची संधी आहे, या भावनेतून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या निवडीबद्दल तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून कृष्णाजी मसुरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विजयकुमार स्वामी, झाकिर भालदार, किसन तिरपणकर, राजेंद्र रोंगे, शिवानंद पांडे, गोरख माळी राघु लाली विकी पोवार विकास पोवार अनिल आमटे अनिल भोमाना सौरभ हराळे सुनील तोडकर अनिल पूजारी बंडू पाटील जालिंद्र कुडाळकर सोमनाथ रांगोळे वैभव पोवार रवी पाटील आदित्य पाटील तुषार शिंदे भरात ताकमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृष्णाजी मसुरकर यांच्या निवडीमुळे हातकणंगले तालुक्यात शिंदेसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, आगामी काळात तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आणि जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.