गंगाखेड ( प्रतिनिधी )
: लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन यांच्या कडून गंगाखेड शहरात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळ्यातून करण्यात आले यात.. डॉ. के. पी. गारोळे पब्लिक स्कूल चे शिक्षक श्री. तानाजी दिगंबर चंदे यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.. अनेक उपकृमातून विद्यार्थ्यांना आनंदी शिक्षण देण्यासाठी त्यांचे नावलौकिक आहे.. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका निभावणारा, तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गंगाखेड शहरांत नाव असलेले शिक्षक म्हणून त्यांना ओळखण्यात येते..
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. गारोळे सर होते तसेच कार्यक्रमास लॉयन्स क्लब फेमिना अध्यक्ष सौ. किरण गारोळे मॅडम, श्री किशोर कुगणे सर, सौ. पल्लवी कुगणे मॅडम, श्री फुलवाडकर सर, श्री ढाकणे सर, श्री देशमुख सर यांची उपस्थिती लाभली..
या पुरस्कारामुळे श्री तानाजी चंदे सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे...
