Breaking Ticker

दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल पट्टन कोडोली येथे रोट्रॅक्ट क्लबकडून क्रीडा साहित्य वितरण

  





धी वैभव हराळे

पट्टण कोडोली (ता. हातकणंगले) : येथील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूलमध्ये रोट्रॅक्ट क्लब ऑफ पट्टण कोडोली, शाळेचे माजी विद्यार्थी क्रिकेट कोच विनोद कोळी व वैभव पाटील यांच्या वतीने कबड्डी व खो-खो खेळाडूंसाठी स्पोर्ट्स किट वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोट्रॅक्ट ऑफ पट्टण कोडोली क्लबचे अध्यक्ष महेश जाधव हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नलवडे सर होते. यावेळी शाळेतील कबड्डी व खो-खो संघातील निवडक खेळाडूंना स्पोर्ट्स किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये जर्सी व ट्रॅक पॅन्टचा समावेश होता. यावेळी अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी व सुविधा मिळाल्यास ते तालुका, जिल्हा नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर नक्कीच चमकतील. याच उद्देशाने आमच्या क्लबने हा छोटासा प्रयत्न केला आहे. "मुख्याध्यापक नलवडे सर म्हणाले, "रोट्रॅक्ट क्लबने केलेले हे सहकार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. शाळेच्या क्रीडा विभागाच्या वतीने मी रोट्रॅक्ट क्लबचे तसेच विनोद कोळी व वैभव पाटील यांचेही मनापासून आभार मानतो. "या कार्यक्रमास रोट्रॅक्ट क्लबचे सर्व पदाधिकारी, शाळेतील शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक बाणदार सर व विद्यार्थी व रोट्रॅक्ट क्लब अध्यक्ष महेश जाधव व सेक्रेटरी सर्वेश हजारे व खजिनदार इराणा नरोणे व सदस्य विनायक कोळी श्रेयश दुर्गे मयुरेश लोहार डॉ.चेतन नाईक प्रणव शिरगुपे अभिनव वागवाडे सुयश पवार आदित्य आवटे रत्नेश हराळे रोहित शिंदे रोहन सावंत आकाश सावंत ओम मुरळी प्रवीण अष्टगे आदित्य खोत सम्मेद खड्ड पारस रोटे सुमित कोरे धैर्यशील काडाकणे ओंकार मुधाळे उपस्थित होते

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.