Breaking Ticker

प्रा डॉ जयश्री पद्मराव देशमुख यांना " उत्कृष्ट प्राध्यापक " पदवीचा राष्ट्रीय पुरस्कार!

  



प्रतिष्ठान कला,संस्कृती आणि साहित्तृय संस्थेकडून पुण्यात झालेला सन्मान

दैनिक समीकरण पालघर जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र मेश्राम......

अकोला -- वाशिम येथील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत आणि प्राचार्य  म्हणून   त्याच  महाविद्यालयात अठरा वर्षाचा प्रदिर्घ प्रशासकीय अनुभव घेऊन सध्यस्थितीत  अध्यापक म्हणून सक्रीय  असलेल्या अकोल्यातील सहयोगी  प्राध्यापक  डॉक्टर जयश्री देशमुख यांना त्यांच्या उल्लेखनिय  अध्यापनसेवेच्या सन्मानार्थ  "उत्कृष्ट प्राध्यापक" हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आलेला आहे.पुण्यात झालेल्या  पंचरत्न सभागृह,संगमवाडी येथे प्रतिष्ठाण कला,संस्कृती आणि साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये या राष्ट्रीय बहुमानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

 प्राध्यापक डाॅ. जयश्री देशमुख यांनी बी.एस.सी, बी.एड. ,एम.एस.डब्ल्यू, आणि समाजकार्य विषयातील  " पश्चीम विदर्भातील  मथूरा  बंजारा समाजातील  नायकांच्या भूमिकेचे विश्लेषणात्मक अध्ययन " या विषयावर  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून विद्यावाचस्पती (Ph. D) पदवी मिळविलेली आहे.त्यांनी विविध विषयांवर  संशोधन केलेले असून,अध्ययन व  अध्यापन  क्षेत्रात त्यांचा जवळपास एकतीस वर्षाचा अनुभव आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये त्यांचे शतकाच्या वर विविध विषयांवर लेख प्रकाशित होऊन त्यांना बहूमोल अशा प्राप्त झालेल्या व्यापक प्रमाणातील प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या शैक्षणिक सेवेतील नेत्रदिपक यशावर झालेले शिक्कामोर्तब ठरलेले आहे.अनेक परिषदांमधील त्यांचा सहभाग हा उल्लेखनीय ठरलेला असून त्यांनी प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांना सुध्दा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे.  त्यांना  मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराच्या बहूमानाबध्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून, त्यांच्या कार्याची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे अशी प्रतिक्रिया  त्यांचे परिचित आणि आप्तेष्ट व्यक्त करत आहेत. 

      प्राध्यापक डाॅ. जयश्री देशमुख यांनी या पुरस्काराचे श्रेय  श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम चे संस्थापक स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक  व स्वर्गीय  मालतीबाई सरनाईक  आईजी,तसेच  शिक्षक  आमदार  अँड  किरणराव सरनाईक  व सर्व सरनाईक  परीवार ,वडील कै. अॕड.पदमराव गणेशराव देशमुख,पती अॕड.कृष्णराव  देशमुख, भाऊ अॕड.राजेश जाधव आणि भाव सासरे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांना दिले आहे. या सर्वांच्या आणि सासरच्या तसेच  माहेरच्या नातेवाईकांच्या प्रोत्साहनामुळेच हा पुरस्कार मी प्राप्त करू शकली अशा सद्भभावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.