अपघात घडत आहे; अभियंता गेले कुणी कडे ?
खुलताबाद तालुक्यातील किनगाव फाटा ते बोडखा- २१९ महामार्गाचे सिमेंटी रस्ता काम जवळपास पूर्ण होत आले असुण ठिकठिकाणी शिल्लक किरकोळ कामे सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर सिमेंट रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहतूक व वाहनांचा वेग ही वाढला असल्याचे चित्र आहे.
मात्र महामार्गा लगत रस्ता कामात विविध त्रुट्या व अपघाती स्थळ निर्माण झाले असल्याचे चित्र असुण अपघात घडत आहे. सिमेंट रस्ता महामार्गावर ठिकठिकाणी ओल्या सिमेंट कामावर लाईनींग पडल्याने दुचाकी बहानधारक त्या लाईनिंग मधे अडकून पडत आहे. तर शेलगाव फाट्यावर मोठा वाक आल्याने व समोरून कोण येत आहे हे दिसत नसल्याने अपघात घडत आहे व वाहने रस्त्याखाली व रस्त्यावर पडत आहे. तर कॅनाल व मंदिरा दरम्यान तेथे ही मोठा वाक आल्याने तेथे ही तोच प्रकार घडत आहे. येसगाव नं ३ गावापुढे धब्या हाटेल जवळ तसाच वाक आहे. पुढे ताजनापूर फाटा येथे तसच वाक आहे. समोरून कोण येत आहे. दिसून येत नाही व वाहनावरचा ताबा सुटतो. व अपघात होतो. तर पासून ते पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मुरुमाचा भराव केलेला नाही सोडधर केलेले आहे. रस्त्यालगत दिशा दर्शक नसल्याने व पांढरे पटटे नसल्याने स्पष्टा दिसून येत नाही. रस्ता लांब व रुंद असल्याने व बाजूचे नंबरींग मैल दगडं नसल्याने रस्ता संभ्रमीत करतो. या महामार्ग रस्त्यालगत केलेले पुलाना व कठड्यांना
रंगरंगोटी नसल्याने अचानक तेथे आल्यावर भिती घबराट वाटते संभ्रम निर्माण होतो. तर ठिकठिकाणी चाऱ्या पुल रस्त्यावर त्या ठिकाणी खोलगट झाल्याने वाहने अदळत आहे. या महामार्गावर शासकीय अभियंता दिसून येत नाही ठेकेदाराच्या खाजगी अभियंता व सुपरवायजर द्वारे हे रस्ता काम झाल्याचे दिसून आले. व्यापारी व नागरिकांना मोठा त्रास झाला परंतु त्यांचे म्हणणे तक्रार समाधान साठी शासकीय अभियंता कधि भेटून आले नाही. जनता व शासनाचा निधी तून हा रस्ता असताना शासकीय अभियंता या रस्त्यावर नियुक्त करण्यात आले नव्हते का? असा सवाल नागरिक करत आहे. पासून ते पर्यंत हा महामार्ग रस्ता काम जवळपास पूर्ण होत आले आहे परंतु अनेक त्रुट्या समस्या समोर आहे याचे निराकरण शासकीय अभियंताला करणे आहे व अंदाजपत्रकनिय कामाला पुर्णविराम देने आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून पाहणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
