Breaking Ticker

येरगी येथे सार्वजनिक बतुकम्मा उत्सव उत्साहात साजरा



*नांदेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*

तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथे संतोष पाटील येरगीकर, यांच्या आयोजनातून सार्वजनिक बतुकम्मा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील माता-भगिनी, युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक गीत, फेरधरी नृत्य आणि फुलांनी सजविलेल्या बतुकम्मांद्वारे संस्कृतीचा जागर केला. बतुकम्मा सजावट स्पर्धे त महिलांनी आकर्षक फुलरचना सादर केल्या. उत्कृष्ट बतुकम्म ांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके परिक्षकांच्या निकालातून देण्यात येणार आहेत.

नैसर्गिक पद्धतीने सजवलेल्या बतुकम्माचे परीक्षण ज्येष्ठपत्रकार गौतम बनसोडे, राजकन्या नागोरी, अर्चना सुरशेटवार, वैशाली सागावे-जाधव, दीपाली कुलकर्णी, अनुसया देगलूरकर व ज्योत्स्ना पब्बावार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सरपंच संतोष पाटील यांनी केले. तर डॉ. सुनील जाधव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यावेळी मुख्याध्यापक नागोराव चव्हाण, बंदोबस्त साठी बिट जमादार राजु दोसलवार,

संभाजी पाटील, शांता तेलंग, आदींसह ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, व बालिका पंचायत पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ, बतुकम्मा उत्सव समिति चे सदस्य पदाधिकारी आणि म हिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. महिला सशक्तीकरण, भक्ती, निसर्गप्रेम, स्त्रीशक्ती आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम घडविणारा हा उत्सव उत्साहात संपन्न झाला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.