Breaking Ticker

पाणीटंचाईची वाट पाहू नका



पनवेलमध्ये आताच जलसंधारणाची कामे सुरू करा!भरत पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

उरण : सुनिल ठाकूर 

पनवेल तालुक्यात भविष्यात उध्दभवू शकणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री भरत पाटील यांनी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील नद्या, ओढे, नाले व तलावांची संयुक्त पाहणी करून लघु बंधाऱ्यांची उभारणी व दुरुस्ती, तलावांतील गाळ काढणे, भूजल पुनर्भरण तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यातील शेतीचे नियोजन, पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

*निवेदन प्राप्त झाल्यानंतर शक्यतो १५ दिवसांत प्राथमिक पाहणी करून संभाव्य पाणीटंचाईग्रस्त क्षेत्रांची नोंद तयार करावी, संबंधित विभागांच्या समन्वयातून कालबद्ध कृती आराखडा निश्चित करावा आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करावा**, अशी ठाम मागणी श्री. भरत पाटील यांनी केली आहे.

“संकट निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संकट टाळण्यासाठी आताच नियोजन करा!” ही भूमिका मांडत शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन श्री भरत पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.