Breaking Ticker

बोरखार येथील जयभवानी नवरात्र मंडळ आयोजित नृत्य स्पर्धा संपन्न.



उरण : सुनिल ठाकूर 

नवरात्रोत्वाच्या चौथ्या रात्री जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ बोरखार आयोजित आणि साई इंटरप्रायजेस-श्री. सुरज म्हात्रे आणि श्री. अतुल ठाकुर पुरस्कृत सोलो नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या नृत्य स्पर्धेत रत्नागिरी, अलिबाग, पेण, उरण, पनवेल, मुंबई येथील स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. दोन गटामध्ये हि स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत *मोठ्या गटात* 

प्रथम क्रमांक - काव्या जठार + प्रदीप गुप्ता - ७००० व ट्रॉफी 

द्वितीय क्रमांक - आर्या नारंगीकर - ५००० व ट्रॉफी 

तृतीय क्रमांक - लालचंद - ३००० व ट्रॉफी 

उत्तेजनार्थ - अक्षय, शुभम रसाळ, हर्षिता कदम

*छोट्या गटात*

प्रथम क्रमांक - दुर्वा झावरे - ५००० व ट्रॉफी 

द्वितीय क्रमांक - मुग्धा उभारे - ३००० व ट्रॉफी 

तृतीय क्रमांक - सान्वी कोठावले - २००० व ट्रॉफी 

उत्तेजनार्थ - साध्वी म्हात्रे, आर्वी पाटील, शास्वती म्हात्रे, दृष्टी ठाकुर

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भाजपा युवा मोर्चा उरण तालुका अध्यक्ष शैलेश शरद गावंड, बोरखार गाव अध्यक्ष तेजस प्रकाश डाकी, जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ बोरखार अध्यक्ष दीपक दामा डाकी, उपाध्यक्ष शंकर ठाकुर, सल्लागार चंद्रकांत राघो डाकी, सचिव मनोहर गजानन डाकी, शिवसेना उपशाखाप्रमुख गुरुदत्त म्हसकर, स्टेप आर्ट डान्स अकॅडमी चे प्रमुख पप्पु सूर्यराव, बापूजीदेव कलामच अमृत म्हात्रे युवा नेते राकेश तांडेल, दिनेश विठ्ठल डाकी,समाधान म्हसकर, रोहण डाकी, सुशांत ठाकुर यांच्या उपस्थितत संपन्न झाला या स्पर्धेचे निवेदन द्रोणागिरी भूषण जिवन डाकी यांनी खुप छान प्रकारे सादर केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.