*मुखेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*
मुखेड येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्याचा trigger -1 (कळ 1) दुष्काळ यादीमध्ये समावेश करा या मागणीसाठी भव्य तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर व शेतकरी वर्ग हजारोच्या संखेने उपस्थित होता. मुखेड तालुक्यात अन्यायाविरोधात व हाक्काच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . मुखेड तालुक्याचा ट्रिगर [कळ 1]दुष्काळ यादीमध्ये समावेश करा,पिक विमा मंजूर करा,अनुदान द्या,विद्यार्थ्यांच्या सर्व फी माफ करा,शेतकऱ्यांचे चालु कर्ज माफ करा 24तास लाईट ठेवा,घरकुलाचे बिल तात्काळ टाका,निराधार,अंपग दिव्यांगाचे प्रश्र सोडवा,चारा,पिण्याच्या पाण्याचा प्रश्र सोडवा, बँकांना कर्ज वाटपाचे आदेश द्या. अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, व शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबरकर,चंद्रकांत घाटे, व मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मागणीसाठी भाषणे करण्यात आले, मुखेड तालुक्यातील शेतकरी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
