नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.
नाशिकच्या सातपूरमधील श्रमिकनगर येथे हप्त्याच्या मागणीवरून बिअर शॉपीची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित कैलास गोरे आणि त्याच्या मित्राने बिअरची मागणी करत दरमहा ५ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.
