Breaking Ticker

ई एस एल कंपनीतर्फे कोडशी खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बॉटल व टिफिन बॉक्सचे वाटप



ता.प्र.:-जगन्नाथ पिदुरकर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी (खुर्द) येथे ई एस एल कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल व टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत शाळेत झालेल्या सकारात्मक बदलांची दखल घेत ई एस एल कंपनीने विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक उपयोगाची भेट दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शाळेचे मुख्याध्यापक कैलाश मस्के यांनी ई एस एल कंपनीच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कंपनीने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच यापुढे शक्य असल्यास ई एस एल कंपनीने शाळा दत्तक घ्यावी किंवा शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी टीव्ही, संगणक व इतर उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल व टिफिन बॉक्सचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून त्यांना छायाचित्र भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाला जगदीश ठावरी, निर्मला ठावरी, सुरेश मत्ते, लोकेश मत्ते, अतुल आसुटकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना वडे, उपाध्यक्ष महेश बोरडे, सदस्य प्रवीण पिदुरकार, शशिकला कांबळे, दीक्षा मेश्राम, रामदास पायताडे, जगन्नाथ पिदुरकर, सचिन टोंगे तसेच शाळेच्या शिक्षिका पुष्पा सोयाम यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, माता-पालक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई एस एल कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन प्रणील टोंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक अशोक राठोड यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.