Breaking Ticker

सगोडा येथे वर्षावास प्रवचनातून ‘साकेत व अयोध्या’ विषयावर धम्मप्रबोधन



‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचनास उपासक-उपासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी  

संग्रामपूर ( गुरुवार, दि. ०१ ऑक्टोबर २०२६) : पवित्र भगवान बुद्धांच्या  वर्षावासानिमित्त वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा, तालुका संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सगोडा ता. संग्रामपूर येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र धम्मग्रंथाचे वाचन तसेच धम्मप्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात बौद्धाचार्य निलेश लाहासे यांनी ‘साकेत (अयोध्या) नगरीचा खरा इतिहास ’ या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण प्रवचन केले. बुद्धकालीन संदर्भ, धम्मविचार आणि ऐतिहासिक संदर्भांच्या अनुषंगाने त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सिद्धार्थ लाहासे आणि सुमेध दामधर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून भगवान बुद्धांच्या विचारांचा, धम्माच्या तत्त्वज्ञानाचा आणि समतेच्या संदेशाचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 

वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन, चिंतन व मनन करण्याची संधी उपासक-उपासिकांना उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे धम्मविचारांच्या अभ्यासाला चालना मिळत असून, सामाजिक प्रबोधनाच्या कार्यालाही व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. कार्यक्रमास सगोडा येथील बुद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रवचनाचे मनोभावे श्रवण करून धम्मविचार आत्मसात करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी कार्यक्रमाचे आभार  सुमेध दामधर यांनी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभा संग्रामपूर शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवर, उपासक, उपासिका शान बालक - बालिका व ग्रंथवाचकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.