प्रतिनिधी,जळकोट कमलाकर वाघमारे
दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी जळकोट शहरातून शुभद्राई पब्लिक स्कूल च्या वतीने व्यसनमुक्त भारत जनजागृती रॅली काढण्यात आली व व्यसनमुक्तीपर प्रत्यक्षीत विद्यार्थ्यांनी करून दाखवले विविध व्यसनमुक्तीपर फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी संदेश दिला व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसेच इतर अमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे.
आजच्या तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांकडे लक्ष केंद्रित करावे. मित्रांच्या दबावामुळे किंवा कुतूहलापोटी व्यसनांच्या आहारी जाणे टाळले पाहिजे. व्यसनामुळे आर्थिक नुकसान होण्यासोबतच कौटुंबिक तणाव वाढू शकतो आणि व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
व्यसनाधीन व्यक्तींना दोष देण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि आवश्यक उपचार मिळवून देणे महत्त्वाचे आहे. कुटुंबीय, शिक्षक, सामाजिक संस्था, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्र येऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर व्यसनमुक्तीचे संदेश पोहोचवून तरुणांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करता येऊ शकते.
व्यसनमुक्त भारताचा संकल्प करूया
व्यसनमुक्त व्यक्ती, सुदृढ कुटुंब आणि निरोगी समाज हेच प्रगत भारताचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येक नागरिकाने स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करावे. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी सहभागी होते
जनजागृतीचा संदेश :
“व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार!
व्यसनमुक्त भारत, समृद्ध भारत!”
