जिल्हा प्रतिनिधी मनोहर भाऊ यरपुरवाड
मुखेड : मुखेड तालुक्याचा ट्रिगर-वनमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू करण्यात याव्यात, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तहसीलदार साहेबांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सवलती व मदत मिळावी, तसेच तालुक्याचा ट्रिगर-वनमध्ये समावेश करून शासनाच्या नियमानुसार दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी मुखेड तालुका ट्रिगर-वनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
