Breaking Ticker

माजी सैनिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू; जमिनीच्या वादातून घडले हत्याकांड

 


 अकोला: जिल्ह्यातील लोतखेड येथे माजी सैनिकाने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ एप्रिलला रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलेअकोट तालुक्यातील लोतखेड येथे एका भूखंडाच्या वादावरून गोळीबार हत्याकांड घडले. अनेक वर्षांपासून हा जुना वाद सुरूच होता. मंगळवारी रात्री पुन्हा वाद झाला. 

या वादातून माजी सैनिक कदीर शाह याने फिरोज पठाण यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये फिरोज पठाण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. फिरोज पठाण हे ऑटो चालक असून, ते गावातील उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.