देवडोंगरी प्रतिनिधी: शंकर निंबारे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड ग्रामपंचाय मधिल भुतारशेत गांव येथे गावालगत पश्चिम वाहीनी वाघनदी आजच्या स्थितीत वाहत असुन गावाची विहीर मात्र कोरडी अवस्थेत आहे. भुतारशेत गावाची अंदाजे लोकसंख्या ३०० च्या आसपास असुन गावाला एकच विहार असुन ती कोरडी झाल्याने महिलांना वाघनदीपात्राच्या पलिकडे जाऊन रखरखत्या उन्हात मोठ्या कसरतीने महिलांना भरलेल्या हंडेचा तोल सावरत नदीपात्रातुन पाणी डोक्यावरुन आणावे लागते.
वाघ नदीवर सिमेंट बंधारे सारखे कुठेही पाणी अडवले नसल्याने पावसाळा संपताच तीव्र पाणी टंचाई समस्येचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो असे ग्रामस्थांनी सांगितले. वाघ नदी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती असते वाघ नदी अद्याप वाहतच आहे. परंतु गांवात अद्याप विहीर कोरडी पडलेली आहे. इथे कुठेही उचल पाणी सोय केलेली दिसत नाही. वाघ नदीवर सिमेंट बंधारे व्हावेत अशी गावकरी यांची इच्छा असुन गावाला पिण्याच्या पाण्याबारोबर शेतीसाठी सुद्धा उपयोग होईल असे गावकरी सांगतात. भुतारशेत गावातील पाणी समस्यावर लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत मार्फत मात करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मनोज वाजे, तसेच बाळु चौधरी,चंदर महाले,देवराम चौधरी,धाकलु खोटरे,महेश चौधरी,शितल चौधरी, जयराम गरेल,रमेश चौधरी,यशवंत चौधरी यांनी केली आहे.
भुतारशेत गावात पाणी टंचाईचा लपंडाव वर्षानुवर्षे चालुच असुन प्रशासनाने भुगर्भातील पाणी स्रोताची तपासणी करून विहीर बांधून जलजीवन मिशन योजनेतून ग्रामस्थांची पाणी टंचाई पुर्णतः निवारण करुन दूर करावी- सामाजिक कार्यकर्ता: मनोज वाजे ओझरखेड
जुन महिन्यात नदीला गढूळ पाणी असते आणि गावातील विहिरीत मुबलक पाणी साठा नसल्याने पावसाळ्याच्या सुरवातीला ग्रामस्थ घरांच्या लवचणीचे पाणी पितात.--देवराम चौधरी स्थानिक ग्रामस्थ
नदी शेजारी गाव असुन विहीर कोरडी होते!नंतर पाण्याने भरलेल्या हंडेचा तोल सावरत महिलांना नदी पात्रातुन पाणी आणावे लागते. प्रशासनाने याची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था करावी. शितल सुरेद्र चौधरी स्थानिक महिला

