Breaking Ticker

शुक्रवार २६ मे रोजी त्र्यंबकेश्वरला महिलांसाठी स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन.



त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: शंकर निंबारे

     महाराष्ट्र शासन आणि महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूस असलेल्या श्रीचंद्र लॉन्स येथे शुक्रवार दिनांक २६ मे २०२३ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महिलांना न्याय मिळावा, अडचणींची शासकीय यंत्रणांकडून सोडवणूक व्हावी आणि समाजातील पीडित महिला वर्गाला मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. 

    यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिबिरात तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. समस्याग्रस्त महिलांनी अर्ज प्राप्त करून घेऊन विहित नमुन्यात भरून ते पुढील कार्य बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय त्र्यंबकेश्वर पंचायत समिती यांच्याकडे सादर करून शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे अध्यक्ष तथा तहसीलदार मंजुषा घाटगे व सचिव तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.