Breaking Ticker

पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन

  


 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार अमर पाटील यांना लोटपाट करून असभ्य वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याच्या आशयाचे निवेदन  हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात मलकापूर तहसीलदार यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी पार पडली. यावेळी बाजार समिती निवडणुकीचे वृत्त संकलन करण्यासाठी नांदुरा येथील दै. मातृभूमिचे पत्रकार अमर पाटील व इतर पत्रकार तेथे गेले असता पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी अरेरावीची भाषा वापरून, हातातील दांड्याचा धाक दाखवत आपल्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला. त्याचप्रमाणे दे. देशोन्नतीचे पत्रकार विनोद गावंडे दे खोज मास्टरचे प्रतिनिधी शुभम ढवळे यांना सुध्दा त्यांनी लोटपाट केली. यावेळी त्याठिकाणी अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

पत्रकारांना अशाप्रकारे चुकीची वागणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांची पार्श्वभूमी व हे गैरवर्तन लक्षात घेता त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.

यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील , विदर्भ समन्वयक श्रीकृष्ण तायडे, विदर्भ सचिव सतीश दांडगे, जिल्हाध्यक्ष गौरव खरे , जिल्हा प्रवक्ता श्रीकृष्ण मेहेसरे, तालुका अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार, अध्यक्ष जमील पत्रकार, विनायक तळेकर, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, नथुजी हिवराळे जिल्हा सहसचिव, धर्मेंद्र राजपूत,प्रदीप इंगळे, अनिल झनके, संजय वानखेडे, मयूर लड्डा, निलेश चोपडे,प्रमोद हिवराळे, प्रकाश थाटे, सय्यद ताहेर,  पंकज मोरे,प्रभाकर मोरे,उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.