पनवेल प्रतिनिधी:- धनाजी पुदाले
पनवेल महानगरपालिका हद्दीतील मोठे नाले आणि बंदिस्त गटारांची पावसाळापूर्वी साफसफाई करावी अशी मागणी पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका निर्मला दत्तात्रेय म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केलली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, पनवेल महानगरपालिका परिसरात मोठे नाले आणि गटारे आहेत, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते आणि नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो म्हणून पावसाळ्यापूर्वी महापालिका हद्दीत सफाई मोहीम शक्यतो १५ जूनच्या आत पूर्ण करावी तसेच गटारी आणि रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी निर्मला म्हात्रे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
