त्र्यंबकेश्वर: तालुक्यातील माणिपाडा ते बाफणविहीर रस्त्याची कित्येक वर्षे दैनियवस्था झाली असून आजही जैसेथे आहे या रस्त्याकडे स्थानिक प्रतिनिधी तसेच प्रशासनेही पाठ फिरवली आहे फक्त दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता असून गेले 30 ते 35 वर्षे पासून या गावाला डांबरीकरण रस्ता झालेला नाही यामुळे वाहन चालकाची तसेच प्रवाशांची अवस्था बिकट होत चालली आहे तसेच या रस्त्यावर अपघातही होत आहेत. एकीकडे ग्रामपंचायत कडून रस्ता डांबरीकरणाला एक कोटीची मजुरी मिळाली आहे असे शाब्दिक माहिती दिली जाते. अवघे तीन किलोमीटरच्या अंतरात रस्त्यात खड्डे आणि रस्त्यातील उधळलेली खडी दगड मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांची दैनियवस्था झाली असून मोटरसायकल तसेच चार चाकी वाहनाच्या टायरने रस्त्यातील उधळलेली खडी दगड उडून लोकांच्या दारात येऊन पडतात. अचानक खडी दगड घराशेजारील खेळणाऱ्या लहान मुलांना तसेच रस्त्याने पायी प्रवाशांना लागल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न रस्त्या लगतच्या ग्रामस्थांनी केला आहे.
पाऊस पडण्या अगोदर रस्त्याचे काम झाले नाही तर रस्त्याची अधिकाधिक दुरवस्था होऊन, एसटी बंद होईल. ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून नाकारता येत नाही. तसेच अतिजोखमीच्या गरोदर माता व तात्काळ उपचारासाठी पेशंटला तीन किलोमीटर उचलून न्यावे लागेल यात गावाची मोठी नुकसान होईल. बाफणविहीरीचा रस्ता 30 ते 35 वर्षात डांबरीकरण बघायला मिळाले नाही. तसेच निवडणूक आली की आश्वासने देतात. असे बाफणविहीरीचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव पागी, तसेच नानेश्वर वळवी, उत्तम माशी, रतिलाल गहले, सोबन खानजोडे, काळूदास गहले, नामदेव तुंबडे, जेष्ठ नागरिक रामू गहले, किसन दळवी यांनी संताप व्यक्त केला व सदरील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून मिळावा अशी प्रशासनाला विनंती केली
