काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना व त्यांच्या परिवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी चित्तापुर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार मानिकांता राठोड व अन्य एका विरुद्ध लोणार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या आदेशानुसार लोणार तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोणार पोलीस स्टेशनला तक्रार
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश श्रीराम मापारी व शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेख समद शेख अहमद यांनी व अन्य पदाधिकारीसह ठाणेदार विजयसिंग राजपूत यांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना व त्यांच्या परिवारांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी आज ११ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता लोणार पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना व त्यांच्या परिवाराला मानिकांता राठोड यांचे कडून जिवे मारुण टाकण्याबाबतच्या धमकीची आडीयो क्लिप सोशल मिडीयाव्दारे मिळाली.
सदर ऑडीओ क्लीप मध्ये चित्तापुर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार मानिकांता राठोड व अन्य एका अज्ञात व्यक्तीसोबत मिळून संगणमताने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना व त्यांच्या परिवाराला जिवे मारण्याची, संपवून टाकण्याची धमकी देताना व कट कारस्थान करतांना आढळून येत आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांना व त्यांच्या परिवाराला गैरअर्जदाराकडून जिवे मारण्याचे कट कारस्थान रचणे म्हणजेच एक प्रकारे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरील गुन्हा हा गंभीर दखलपात्र व आजामीनपात्र स्वरुपाचा आहे. तसेच देशाच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या अध्यक्ष स्थानी असणाऱ्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देणे, हा प्रकार अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे.
सदर प्रकरणात भादंवि कलम १२० ब. ५०४ व ५०६ अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या चित्तापुर मतदार संघाचा अधिकृत उमेदवार माणिकांता राठोड व अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. मा. सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार व ईतर खटल्यात दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार दखलपात्र अजामीनपात्र गुन्हयात दाखल करून घेणे बंधनकारक आहे.
त्यामुळे सदर प्रकरणांत खट दाखल करून सदर आरोपींना अटक करण्यात यावी, असे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी राजेश मापारी, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी शेख समद शेख अहमद, परदेश सेवा दलाचे प्रकाश धुमाळ, माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष शांतीलाल गुगलीया, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षअनिकेत मापारी माजी नगराध्यक्ष गट नेते, भूषण मापारी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे शहरप्रमुख गजानन जाधव, नगरसेवक शेख रहुफ भाई, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे, माजी नगरसेवक शेख असलम शेख कासम, माजी नगरसेवक पंढरी चाटे. गजानन मापारी, माजी नगरसेवक शाम राऊत, संजय काशीराम जाधव, आप्पा शिंदे, एन. एस. यु .आय सरचिटणीसशेख जुनेद शेख करामत, शेख जुबेर चौधरी, शेख अखिल मुल्लाजी यांनी म्हटले आहे.
