त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: शंकर निंबारे
दिनांक 21 जून, 2023
आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी येवला, निफाड, इगतपुरी सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी 30 जून 2023 पर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी कळविले आहे.
इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, आदिवासी विकास भवन, जुना आग्रारोड, गडकरी चौक, नाशिक येथे पाल्याचा जन्म दाखला व पालकाचा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला 24 जून 2023 पर्यंत सादर केल्या नंतर प्रवेशचा अर्ज विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशाचा अर्ज परिपूर्ण भरून 30 जून 2023 पर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादर करावा.
आधार पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचीच नोंद घेण्यात येईल. अर्ज भरून दिल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जातील कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित पालक व पाल्यांना कधी व कुठे उपस्थित रहायचे याबाबत नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सूचना देण्यात येतील. त्याचप्रमाणे मंजुर लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लकीड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यांचे अर्ज त्या त्या संबंधित प्रकल्प कार्यालयात स्विकारले जातील, असेही प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी कळविले आहे.
*प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे….*
• विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा
• पालकाच्या नावे सक्षम अधिकऱ्याने अनुसूचित जमातीचा दाखला दिलेला असावा
• विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधीत यादीतील अनुक्रमांक नमुद करून दाखल्याची सत्यप्रत जोडावी
• पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये १.०० लाख इतकी राहील (सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नांचा दाखला)
• इ.१ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर २०२३ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे. त्याचा जन्म १ ऑक्टोंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१७ या दरम्यान झालेला असावा.
• विद्यार्थ्याचे आधारकार्ड आवश्यक आहे.
• विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
• विद्यार्थ्याचे २ पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
• विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत.
• विद्यार्थी अनाथ, अपंग, महिला पालक, विधवा, घटस्पोटीत निराधार परितक्त्या असल्यास सोबत दाखला जोडावा.
• निवड झालेल्या विद्यार्थ्याची शाळा बदलता येणार नाही. त्या बाबतचे पालकाचे हमी पत्र जोडणे अवश्यक आहे.
• पालकाने कोणतीही खोटी माहिती दिल्यास व ती तपासणीत आढळुन आल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल व तसेच फौजदारी गुन्हा सादर करण्यात येईल.
