लोणार तालुका प्रतिनिधी:- सुनिल वर्मा
लोणार नगरपालिकेच्या वतीने तहसीलदार यांना लोणार नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ पुनम पाटोळे, उपाध्यक्ष बादशाह खान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, पाणीपुरवठा सभापती सौ ज्योत्स्ना सरदार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, यांनी आज दिनांक 21 जून रोजी सकाळी अकरा वाजता नायब तहसीलदार सौ. परळीकर मॅडम यांना निवेदन देण्यात आला.आपणास सविनय पुर्वक निवेदन सादर करण्यात येते की. रमाई आवास योजना नगर परिषद लोणार अंतर्गत दि.२६/०५/२०२३ रोजी शासन आपल्या दारी वा कार्यक्रमा मध्ये रमाई आवास योजने अंतर्गत व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. सदर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी रेतीची आश्यकता आहे. परंतू अद्याप पर्यंत रेती वाहतुकीस मंजूरी न दिल्यामुळे घरकुल लाभाथ्र्यांना घरकुलाचे बांधकाम करता येत नाही. सदर लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्यामळे, त्यांनी त्यांचे कच्चे घराचे बांधकाम तोडले आहे.
त्यामुळे अशा लाभाथ्यांना व त्यांच्या कुटुंबाना उघड्यावर रहावे लागत आहे. तरी अशा लाभार्थ्यांचे घरकुल येणाऱ्या पावसाळ्याच्या आगोदर लवकरात लवकर पुर्ण व्हावे यासाठी आपल्या स्तरावरून शासन आदेशानुसार जप्त केलेली रेतीच्या साठ्या मधून अशा लाभार्थ्याना रेतीचा पुरवठा करण्यात यावा ही विनंती. सदर घरकुल लाभार्थ्यांना रेती न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल व होणाच्या नुकसाणीस शासन जबाबदार राहील. करीता लोणारचे तहसीलदार यांना नवनाथ नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पूनम पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशाह खान, तालुकाध्यक्ष राजेश मापारी, पाणीपुरवठा सभापती सौ जोशना सरदार, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, गुलाब सरदार,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक हाजी गफार कुरेशी, मनीष पाटोळे, अनिल पाटोळे,यावेळी लाभार्थी पुंडलिक भगत, सीमा अंभोरे, बालक भगत, बाबाराव कळासरे, अर्जुन इंगोले, नारायण चाटे, शितल अशोक, प्रल्हाद इंगोले, शांताबाई खिल्लारे, विमल तुर्कमाने, परसराम खिल्लारे, शेषराव पन्हाळ, रमेश गवई, कैलास गवई, लक्ष्मण पसरटे,
महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज गोरगरिबांना रेती लागते घरकुल बांधण्यासाठी शासनाने केलेल्या धोरणामुळे गोरगरीब वंचित राहत आहे यामुळे गोरगरिबांना घर बांधणे अवघड झाले आहे. अवैधरीत्या रेती जवळपास 12 हजार रुपये ब्रास मिळते परंतु गरिबांना रमाई घरकुल असो किंवा घरकुल यासाठी अत्यावश्यक रेती आहे ती गोरगरिबांना लोकांसाठी व्यवस्था नाही आमची शासनाला मागणी आहे की या गोरगरिबांना घरकुल बांधण्याकरिता शासनाने रेती फक्त द्यायला पाहिजे होती ती रेती शासनाने गोरगरिब लोकांना शासनाने त्वरित रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोणार नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, व नगरसेवकांनी, लोणार तालुका काँग्रेस कमिटी, लोणार शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले शासनाने लवकरात लवकर गोरगरीबांना रेती उपलब्ध करून न दिल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन करू --राजेश मापारी तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अवैध वाळूला पाबंद घालण्यासाठी माननीय तहसीलदार जोशी साहेबांनी तात्काळ कारवाई करावी कुठल्याही राजकीय दबावापोटी अवेध वाळुची वाहतूक करण्यासाठी हायवा ट्रॅक्टर चालता कामा नये याची नोंद घ्यावी--राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र इब्राहिम शेख
वाळूच्या माध्यमातून राज्य सरकारला लाखो रुपयाचा महसूल प्राप्त होत असतो परंतु वाळू माफियांच्या दबावापोटी लोणार शहरासह तालुक्यात अवैध वाळूचा व्यवसाय होत आहे याकडे तहसीलदारांनी लक्ष द्यावे.---शेख समद शेख अहमद शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे घरकुलाचे रेती अभावामुळे काम रखडले अनेक घरकुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. जुन महिना संपत आलेला आहे त्यामुळे सर्व सामान्याचे हाल होतील त्यांना सक्त रेतीची गरज आहे तसेच बांधकाम मजुराची उपासमार होत आहे शासनाने त्वरित घरकुल धारकांसाठी रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल--संतोष मापारी नगरसेवक
