Breaking Ticker

अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी



लोहा ( ता. प्र किरण दाढेल.)

 लोहा तालुक्यातील आंबेडकरी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील घटनेचा लोहा तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

मौ. बोंडार हवेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भिमजयंती मिरवणुक या वर्षी पहील्यांदाच अक्षय भालेराव यांनी गावातुन काढल्याचा राग मनात धरून दि.१/६/२०२३ रोजी सायंकाळी गावातील जातीयवादी गावगुंडानी निघृण हत्या केल्याच्या घटनेचा निषेध करून तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देण्यात अलि. व अक्षय भालेराव यांच्या पिडीत कुटूंबियांना एक कोटी रुपयांची शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातीले एका व्यक्तीस सरकारी नौकरी देण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

 अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या हत्ये मागे कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा हात आहे याची सिबिआय मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अक्षय भालेराव यांच्या कुटूंबियांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना देण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते तथा लोहा नगर परिषदेचे नगरसेवक बबनराव निर्मले, भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा लोहा नगर परिषदेचे नगरसेवक बालाजी खिल्लारे, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संघटक अनिलदादा गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे युवा तालुकाध्यक्ष बुद्धभुषण खिल्लारे, युवा नेते सचिनभाऊ आढाव, सामाजिक कार्यकर्ते गिरीष भालेराव, राहुल एडके, यशपाल निर्मले, सोपान जोंधळे आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.