देवडोंगरी प्रतिनिधी: शंकर निंबारे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा ठाणापाडा येथील ९ विद्यार्थी व ४ विद्यार्थीनी असे १३ विद्यार्थींची खेलो इंडिया रुरल अॕड इंडिजिनिअस नॕशनल गेम्स या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धा दि. ९ जुन २०२३ ते १२ जुन २०२३ या कालावधीत कलिंगा इन्स्टिट्युट आॕफ सोशल सायन्सेस, भुवनेश्वर ओडीसा या ठिकाणी होणार आहेत. खेलो इंडिया रुरल अॕड इंडिजिनिअस नॕशनल गेम्स या स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मा. सहाय्यक जिल्हाअधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान (IAS), सहा.प्रकल्प अधिकारी रामचंद्र तडवी, विस्तार अधिकारी खंडु भोये, मुख्याध्यापक अशोक चौरे, अधिक्षक अरुण बागले, अधिक्षिका पुणम बावणे, क्रिडा शिक्षक सागर कटारे, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे मदत व मार्गदर्शन लाभले आहे.
ठाणापाडा परिसर, गाव, पाडा, वाडीवस्ततील ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे
