Breaking Ticker

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्यावर गुन्हा दाखल कारवा

 


 प्रतिनिधी सुनिल वर्मा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कारवा अशी मागणी लोणार समता परिषदेने आपल्या निवेदनात जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना लोणार पोलीस स्टेशन ढाणेदार राजपूत यांच्या मार्फत केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडिक टेल्स ही वेबसाईट चालवते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे.

 तरी,सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' आणि 'हिंदू पोस्ट' वेबसाईटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर अतिशय कठोर कायदेशीर कारवाई करावी,ही विनंती

 अखिल भारतीय समता परिषद लोणार तालुक्याच्या वतीने करण्यात आली

 याप्रसंगी लोणार समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन रामदास कापुरे, माजी नगरसेवक शाम राऊत, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष गजानन जाधव, रंजीत जावळे, बागडे, गजानन शिंदे, सुनील मापारी, विशाल गरुडकर, गजानन घोडके, मनू मोरे, रवी खरात, अक्षय चोपडे, शिवम जावळे, गणेश भोसले, नारायण आढाव, अमोल खंदारे, गजानन भाऊ मोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.