त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: शंकर निंबारे
दिनांक २/५/२०२३
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा येथील शहिद राजगुरू माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश, एस.एस.सी मार्च२०२३ बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९४% लागला आहे. कुमारी. हेमलता आनंदा गारे देवडोंगरा हि विद्यार्थीनी दहावीत प्रथम आली ७७.६०%, कुमारी. जयमाला ज्ञानेश्वर वळवी बाफणविहीर या विद्यार्थीनीने मिळवला द्वितीय क्रमांक ७६.६०% तसेच कु. अजय विलास धुम तृतीय क्रमांक, कु. प्रमोद प्रकाश पवार चौथा क्रमांक, कुमारी.अलका हरिदास पवार पाचवा क्रमांक पटकावुन विद्यालयात घवघवीत यश मिळवले. तसेच सर्व उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचे व आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले.
शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, सर्व उपशिक्षक, कला क्रीडा, संगणक, सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यभुमिका घेऊन शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे विद्यालयाचा निकाल उत्तम लागला अशा प्रतिक्रिया पालकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
शहिद राजगुरू विद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष आमदार कॉ. जे.पी. गावित व सर्व संचालक, आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगूण, मुख्याध्यापक पी.जे. भामरे, गटशिक्षण अधिकारी मोठाभाऊ चव्हाण
केंद्रप्रमुख -संजय गांगुर्डे, उपशिक्षक पी.बी भोये,ए.एच. ठोमरे, पी.डी. भामरे, डी.के. कोंडार, शिपाई संदिप मानभाव, शालेय व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष संजय कोंगील, सरपंच पवन गावित, उपसरपंच राहुल चौधरी व सर्व ग्रा.पं.सदस्य, माजी सरपंच महादु पवार, विष्णु निंबारे, छबीबाई निंबारे, बाफणविहीरचे माजी पो.पाटील अमृता वळवी, परिसरातील पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदिंनी सर्व उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील शिक्षणाच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
.jpg)