Breaking Ticker

सागरा प्राण तळमळला'नाट्यप्रयोगाला पनवेलकर नाट्य रसिक,सावरकर प्रेमींचा उदंड प्रतिसाद.



पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले 

    सागरा प्राण तळमळला' नाट्यप्रयोगाला पनवेलकर नाट्य रसिक,सावरकर प्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला असल्याचे महानगरप्रमुख,माजी नगरसेवक ॲड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हर घर सावरकर संकल्पनेअंतर्गत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांच्या पुढाकाराने व आदेशाने पनवेल येथे 'सागरा प्राण तळमळला' या नाटकाचा विनामूल्य प्रयोग पनवेलकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला.

शिवसेना- भाजपाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन यशस्वी करण्यात आले.प्रचंड संख्येने सदर प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रयोगादरम्यान नाट्यरसिकांचा व सावरकर प्रेमींचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचवणे या प्रामाणिक जाणिवेतून ही मोहीम सुरू आहे. सावरकर आणि हिंदुत्व फक्त एखाद्या प्रसंगापुरते - राजकारणासाठी वापर न करता एखादे व्रत घेतल्याप्रमाणे सावरकरांच्या विचारांचा जागर हा कायम सुरूच आहे.

स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सोनावणे,शहरसंघटक अभिजीत साखरे,उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी,विभागप्रमुख आशिष पनवेलकर,तोफिक बागवान, साहिल भुस्कुटे तथा शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक व बीजेपी सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन व संपूर्ण टीमचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.