सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील बिबी येथे बाजारात भांडण केल्याच्या कारणावरून एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी ३ महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बीबी येथील उषा दिलीप सभाकर या महिलेने पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली की सासू वच्छला सभाकर सवत लता दिलीप सभाकर व ननंद वंदना रमेश खंडारे या तिघी घरासमोर आल्या व बाजारात भांडण का केले असे म्हणून डोक्याचे केस धरून खाली पाडली पाठीवर पायावर हातावर काठीने मारहाण केली व चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
उषा दिलीप सभाकर या महिलेने दिलेले फिर्यादीवरून सासू वच्छला सभाकर, सवत लता सभाकर व ननंद वंदना खंडारे यांच्याविरुद्ध बीबी पोलीस स्टेशनला कलम 324, 323, 504 ,506 ,34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
