सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील वढव येथे शेती वाटणीच्या कारणावरून काकाने पुतण्याला कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी काका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वडव येथील करण तनपुरे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की वढव शिवारात सहा एकर सामायिक शेती असून शेतात गेलो असता काका बाबुराव तनपुरे हे शेतात होते त्यांना शेतीची वाटणी करून द्या असे म्हटले असता शेती वाटून देणार नाही शेतीचे बाहेर व्हा असे म्हणून काका बाबुराव तनपुरे यांनी कुराडीने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली
करण तनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबुराव तनपुरे विरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला कलम 324 504 506 बांधव नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असल्याची माहिती १९ जून रोजी देण्यात आली आहे.
