(लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा)
लोणार:- तालुक्यातील सावरगाव तेली-भूमराळा रेती घाटातून विनापरानगी अवैध उत्तखनन करून रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन विनानंबरच्या रेती वाहनावर महसूलच्या भरारी पथकाने कारवाई केल्याची घटना २१ जूनच्या राजेदरम्यान भूमराळा शिवारात घडली.
दिवसेंदिवस अवैधरीत्या रेती वाहतूकीचे प्रमाण वाढल्याने याला पायबंध घालाण्यासाठी महासूल विभागाने भरारी पथकाची स्थापना केली. भूमराळा पाटीजवळ एक टिप्पर व एक टॅम्पो रेतीने भरलेला आढळून आल्याने तहसीलदार गिरीश जोशी तलाठी अशोक सौदर,अनिल इव्हळे, जयदेव येऊल पनड . केंद्रे यांनी सदर वाहने दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आली. सदर दोन्ही वाहनावर ३ लाख ६६ हजार रुपायाचा दंड आकरण्यात आला आहे.विशेष म्हणजे दोन्ही रेती वाहने विनानंबरची आहे. नंबर प्लेटवर मातीचा लेप लावण्यात आला. खरा प्रश्न हा आहे. आरटीओ विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का दिवसभर कागदपत्रे तपासणी करणारे वाहतूक पोलिसांना असे विनानंबरचे वाहने दिसू नये म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
